राज्यातील पहिले बाल एनसीडी लिनिक जिल्हा रुग्णालयात

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
वर्धा,
बालक व किशोरवयीन मुलांमधील असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान व व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने येथील जिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिले समर्पित अत्याधुनिक बाल एनसीडी लिनिकचा शुभारंभ जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांची उपस्थिती होती. संबंधित बाल एनसीडी लिनिक सुविधेची स्थापना युनिसेफ महाराष्ट्रच्या सहकार्याने, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि एम्स नागपूर यांच्या सहयोगाने करण्यात आली आहे. या लिनिकमध्ये बालक व किशोरवयीन मुलांसाठी तपासणी, वैद्यकीय मूल्यांकन, निदान, उपचार, समुपदेशन, संदर्भसेवा आणि नियमित पाठपुरावा यासाठी एकात्मिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयात बाल एनसीडी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 
 

4557 
 
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ओळख झालेल्या ११४ बालक व किशोरवयीन मुलांना आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत रुग्णालयात आणण्यात आले व त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. यात विकासात्मक विलंब २१, जन्मजात हृदयरोग १९, स्थूलता १६, टाईप १, मधुमेह १४, सिकलसेल आजार २१, दमा १, मानसिक आरोग्य १ आणि इतर आजार १४ अशा रुग्णांचा समावेश होता. हृदयविषयक तपासणी आवश्यक असलेल्या ९ बालकांची २ डी-इकोकार्डियोग्राफी करण्यात आली. या शिबिरात एम्स नागपूरच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकातील डॉटर व वर्धेतील डॉटरांनी बालकांची तपासणी करून आवश्यक उपचार, पुढील तपासण्या व संदर्भसेवेबाबत मार्गदर्शन केले. शिबिराला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले यांचे योगदान लाभले. जिल्हा रुग्णालयातील हे समर्पित बाल एनसीडी लिनिक बालकांमध्ये आजारांचे लवकर निदान, तज्ज्ञांकडे संदर्भ, उपचार आणि सातत्यपूर्ण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यास मदत करणार आहे. महाराष्ट्रातील बाल एनसीडी सेवांच्या बळकटीकरणासाठी हे एक आदर्श मॉडेल म्हणून विकसित होणार आहे, अशी प्रतिक्रीया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजसिंग पवार यांनी दिली.