लुधियाना,
Political Newsपंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्यावर शनिवारी लुधियानात माजी केंद्रीय मंत्री रवनीतसिंग बिट्टू आणि भाजपा कार्यकर्त्यांनी टोमॅटो फेकून मारले. या घटनेनंतर पोलिसांनी रवनीत यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, एक दिवसापूर्वीच रवनीतसिंग बिट्टू यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला हाेता़.
मुख्यमंत्री भगवंत मान पंजाब कृषी विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमातून निघताना माजी केंद्रीय मंत्री रवनीतसिंग बिट्टू यांनी भाजपा कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या ताफ्यावर टोमॅटो फेकले. रवनीत यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली.
मादक पदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
रवनीतसिंग बिट्टू यांनी आरोप केला की, पंजाबमध्ये आप सरकारकडून मादकपदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहन दिले जात आहे़ त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री मान यांना अंडी, दारूच्या बाटल्या आणि टोमॅटो परत दिले आहेत. माझ्या ताफ्यावरही आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता़ या घटनेची माहिती मी केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली आहे.