मुंबई,
ramayana upcoming eng movieरणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी अभिनीत ‘रामायण : भाग १’ च्या प्रदर्शनाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर आणि ‘जय जय राम’ या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. मात्र ‘रामायण : भाग १’ ची इंग्रजी आवृत्ती हिंदी आवृत्तीपेक्षा अंदाजे ३० मिनिटांनी लहान असेल.
इतकेच नाही, तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना लक्षात घेऊन या आवृत्तीत गाणी नसतील आणि काही दृश्येही लहान केली जातील. निर्मात्यांनी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. भारतीय प्रेक्षकांना तीन तास किंवा त्याहून अधिक लांबीचे चित्रपट आणि गाणी सहज समजतात, परंतु जगभरातील प्रेक्षकांच्या बाबतीत असे असेलच असे नाही. याच कारणामुळे, चित्रपटाची आंतरराष्ट्रीय आवृत्ती थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे.