देवळीत उद्यापासून सुरक्षा रक्षक भरती

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
देवळी, 
Security Guard Recruitment in Deoli बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी देवळी येथे २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान सुरक्षा रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवस्वराज्य सेयुरिटी अ‍ॅण्ड मॅन पॉवर सर्विसेस प्रा. लि. आणि एस. एन. एस. जे. महाविद्यालय, देवळीच्या प्लेसमेंट सेलच्या संयुत वतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पसारा कायदा २००५ अंतर्गत मान्यताप्राप्त तसेच आयएसओ मान्यताप्राप्त संस्थेमार्फत ही भरती केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. निवड झालेल्या युवकांना महाराष्ट्रात नोकरीची संधी मिळणार असून सुरुवातीला महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा किमान वेतन नियमानुसार १६ हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
Security Guard Recruitment in Deoli
 
 
 
निवड झालेल्या उमेदवारांना पीएफ, मेडिकल, ग्रॅज्युइटी, पीएफ पेन्शन, तसेच नियमानुसार विविध भत्ते मिळणार आहेत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत पात्र नवीन कर्मचार्‍यांना नोकरी लागल्यानंतर १५ हजार रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात मिळणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. या भरतीसाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा. वय १८ ते ४५ वर्षे, उंची १६५ सेंमीपेक्षा अधिक आणि वजन ४८ किलोपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असावा, आधारकार्ड झेरॉस, शालेय प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची झेरॉस आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत एस. एन. एस. जे. महाविद्यालय, देवळी येथे होणार आहे. तालुयातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, काही गरज भासल्यास संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य व भरती अधिकार्‍यांनी केले आहे.