वर्धा,
evonith steel celebrate राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून इव्होनिथ स्टीलने वर्ध्यातील तळागाळातील क्रीडा परंपरेचे रुपांतर विविध समुदायांमधील नवोदित तरुण खेळाडूंकरिता संधींमध्ये करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना अधिक चालना दिली आहे.
कंपनीने अलीकडेच वर्ध्यातून नवोदित टॅलेंट शोधण्यासाठी ट्रायल्स घेतल्या, ज्यामध्ये १२ ते २५ वर्ष वयोगटातील जवळपास ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला. या भागातील आशादायक तरुण टॅलेंटसाठी एक मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत इव्होनिथ योद्धा कबड्डी संघाची घोषणा सप्टेंबरमध्ये केली जाणार आहे. निवडलेले खेळाडू इव्होनिथ योद्धा क्लबचा भाग बनतील आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि या भागातील स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल.
वर्ध्यातील उत्पादन प्लांटच्या आवारात evonith steel celebrate आयोजित केल्या जाणाऱ्या कंपनीच्या वार्षिक क्रीडा दिनामध्ये खो-खो, कबड्डी आणि क्रिकेट यांसारख्या विविध लोकप्रिय खेळांमध्ये २० गावांतील जवळपास ८०० तरुण, महिला आणि मुलींचा सहभाग पाहायला मिळतो.
इव्होनिथ स्टीलने ३० गावांमधील ५० हजारहून अधिक ग्रामीण नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. (वा. वा.)