तांत्रिक अडचणीने खात्यात आलेले पाच लाख परत केले

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
रिसोड
technical-glitch बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या बुलढाणा येथील मुख्य शाखेतून पाच लाख रुपये तांत्रिक अडचणीने वाशीमचे खातेदाराचे खात्यात चुकीने जमा झाले. सदर खातेदाराने ती रक्कम लगेच परत करून बँकेस सहकार्य करुन माणुसकीचा परिचय दिला.
 
risod
बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्य शाखेतून पाच लाख रुपयांची रक्कम चुकीने १ सप्टेंबर रोजी वाशीम शाखेचे खातेदार मुकेश मधुकर वसमतकर यांचे खात्यात जमा झाली. बँक व्यवस्थापक गोपाल बाळदी यांनी खातेदार मुकेश वसमतकर यांना याची माहिती दिली. खातेदार मुकेश वसमतकर हे लगेच बँकेत पोहोचले व त्यांनी सांगितले की ही रक्कम माझी नाही आपण योग्य ती बँक प्रक्रिया पूर्ण करून माझे खात्यातून ती रक्कम वळती करा.
 
बँक व्यवस्थापक गोपाळ बाळदी व विभागीय व्यवस्थापक अमोल शिंदे यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून सदर रक्कम पुन्हा ज्या खात्यातून आली त्या खात्यामध्ये जमा केली. पैशाची कोणतीही लालसा न ठेवता मुकेश वसमतकर यांनी रक्कम परत करून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले.