सावधान... नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी पुन्हा सक्रिय

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
job scam वैद्यकीय रुग्णालयात लिपिक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाची व त्यांच्या नातेवाईकाची २७ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
job scam
 
बोखारा येथील रहिवासी प्रदीप कमलाकांत खसारे (४१) यांच्या पत्नीला नागपुरात मेडिकल हॉस्पिटलमध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे सांगून, आरोपी देवेंद्र साहेबराव तायडे (वाघोली, पुणे) याने २५ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर २३ लाख रुपये ठरले. ३ ऑगस्ट २०२४ ते १८ जून २०२५ दरम्यान आरोपी देवेंद्र याने त्याचे साथीदार रविराजकुमार सिंग (बेसा, नागपूर) आणि कुमार नावाच्या job scam  इसमाद्वारे प्रदीप यांच्याकडून मूळ कागदपत्रे व २३ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. नोकरीबाबत विचारणा केली असता आरोपींनी वेळोवेळी टाळाटाळ केली आणि पैसेही परत केले नाहीत. याच पद्धतीने आरोपींनी प्रदीप यांचे नातेवाईक रवींद्र कावलकर यांच्याकडूनही १४ लाख ५० हजार रुपये घेतले. आरोपींनी संगनमत करून दोघांच्या पत्नींना नोकरी न देता एकूण २७ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी प्रदीप खसारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.