कराळे यांना अटी-शर्तीवर जामीन मंजूर

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
वर्धा
karale bail समाज माध्यमांवर एका विशिष्ट समाजाविषयी व्हिडीओ पोस्टद्वारे जातीवाचक टिप्पणी केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नितेश कराळे यांच्या जामीन अर्जावर आज बुधवार २ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तीवादानंतर अटी व शर्तीवर कराळे यांना जामीन मंजूर केला.
 
karale
नितेश कराळे यांच्यावर जातिवाचक शिविगाळ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अमरावती येथून अटक केली होती. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. जामीन अर्जावर बुधवार २ रोजी वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने वकिलांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर कराळे यांना अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला. नितेश कराळे यांची बाजू अॅड. गुरूराज राऊत यांनी मांडली.