गोंडेगाव येथे स्मशानभूमीचा अभाव

शेवटची विधी पार पाडण्यात अनंत अडचणी

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
मानोरा
lack-of-crematorium तालुयातील गोंडेगाव येथे स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने येथे अंत्यसंस्कारासाठी नागरिकांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.गाव तेथे मशानभूमी ही संकल्पना जरी शासन राबवत असले तरीही गोंडेगाव येथे अजूनही स्मशानभूमी बांधण्यात आलेली नाही त्यामुळे विकासापासून कोसो दूर गोंडेगाव असल्याचे दिसून येते.
 
manora
येथे शासकीय व गायरान जमीन आहे त्या जमिनीमध्ये संबंधितांनी पाहणी करून मशानभूमी मंजूर करून बांधून देण्यात यावी करिता गोंडेगाव वाशीयांनी गट विकास अधिकारी तसेच तहसीलदार मानोरा यांना त्वरित स्मशानभूमी देण्यात यावी करीता १ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन दिले आहे. निवेदनावर गोपाल राठोड, निर्दोष जाधव, गिरीशंकर पारधी, आशिष वाघमारे,विशाल सोनटक्के, रामदास मानतुटे, विशाल जाधव व इतर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.