‘एनसीएमसी‘ कार्डची सक्ती ; वाहकांची डोकेदुखी वाढली

तांत्रिक तयारीअभावी वाहक, प्रवासी त्रस्त

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
वाशीम,
ncmc card महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी मंगळवार, १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांना ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) द्वारेच सवलतीचे तिकीट देण्याचा निर्णय लागू केला आहे. मात्र, तांत्रिक तयारीअभावी हा निर्णय प्रवाशासह वाहकांसाठीही डोकेदुखी ठरत असल्याच्या तक्रारी आहेत.
 

ncmc card mandatory in msrtc: technical issues trouble passengers and conductors in washim 
एनसीएमसी कार्डमध्ये बसमधील वाहकांमार्फत रक्कम भरण्याची (टॉप-अप) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ई-तिकीट यंत्रातील सॉफ्टवेअर वारंवार हँग होणे आणि नेटवर्कची समस्या यामुळे कार्ड टॉप-अप करण्यात अडथळे येत आहेत. अनेक प्रवाशांच्या कार्डवर आवश्यक शिल्लक नसल्याने वाहकांना सवलतीचे तिकीट देता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना तिकिटाचे पूर्ण पैसे भरावे लागत आहेत. परिणामी, बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमध्ये वादावादीचे प्रकार वाढल्याचा दावा आहे.
सणासुदीचे दिवस सुरू असताना महिलांना सवलतीच्या प्रवासाची सुविधा असली तरी कार्डची सक्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. ‘एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे सणासुदीतच जाचक अटी लावून बहिणींच्या खिशाला कात्री लावायची,’ असा सवाल संतप्त महिला प्रवासी करीत आहेत. एनसीएमसी कार्ड सक्तीचे केल्यानंतरही अनेक प्रवाशांची कार्डे सक्रिय नसल्याच्या तक्रारी आहेत. वाहकांच्या मोबाइलचे इंटरनेट सुरू केल्याशिवाय ई-तिकीट यंत्र सक्रिय होत नसल्याने वाहकांचाही मनस्ताप वाढला आहे. ई-तिकीट यंत्रे हँग होणे आणि नेटवर्कअभावी व्यवहार ठप्प होणे, या समस्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
एनसीएमसी कार्ड सक्तीचे केल्यानंतरही अनेक प्रवाशांची कार्डे सक्रिय नसल्याच्या तक्रारी आहेत. वाहकांच्या मोबाइलचे इंटरनेट सुरू केल्याशिवाय ई-तिकीट यंत्र सक्रिय होत नसल्याने वाहकांचाही मनस्ताप वाढला आहे. ई-तिकीट यंत्रे हँग होणे आणि नेटवर्कअभावी व्यवहार ठप्प होणे, या समस्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एनसीएमसी कार्ड कार्यप्रणालीच्या सर्व्हरवर वाढलेल्या ताणामुळे जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना प्रवासा दरम्यान सवलतीचे तिकीट देण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अमृत ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये (हाताचे ठसे न उठणे) अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेता त्यांच्या विषयी सक्ती करण्यास एसटी महामंडळाने काही काळ वाढवून दिला आहे.
एसटी महामंडळाकडून ‘या’ प्रवाशांना दिलासा
एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांसाठी १ सप्टेंबर २०२६ पासून ’एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य केले असले, तरी तांत्रिक अडचणी व ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महामंडळाने काही महत्त्वाचे शिथिलता देणारे निर्णय घेतले आहेत. यामुळे गणेशोत्सव, तीर्थाटन आणि ऑनलाईन बुकिंग करणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व्हर डाऊनमुळे १४ सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकीटस्मार्ट कार्ड सक्तीमुळे सर्व्हरवर अचानक ताण वाढल्याने तिकीट काढताना मोठी अडचण निर्माण होत होती व प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची दखल घेत सक्षम प्राधिकार्‍यांच्या मंजुरीने १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत सवलतधारकांना पूर्ववत मॅन्युअल (कागदी) तिकीट देण्यास परवानगी देण्यात आली आहे.