स्मार्ट मीटरविरोधात सेलूत मोर्चा

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
सेलू
protest-against-smart-meters स्मार्ट मीटर सक्तीने बसविल्यानंतर वीज ग्राहकांना भरमसाठ देयके येत असल्याचा आरोप करीत स्मार्ट मीटर काढून जुन्या पद्धतीचे मीटर बसविण्याच्या मागणीसाठी साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने बुधवार २ रोजी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

smart meter 
 
साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक रविंद्र कोटंबकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता सेलू बसस्थानक येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा कार्यालयात दाखल होताच उपकार्यकारी अभियंता शिरपूरकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर कार्यकारी अभियंता पारधी हेही कार्यालयात पोहोचले. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी मांडल्या. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढावेत तसेच वीज बिलांबाबत ग्राहकांना न्याय मिळावा, आदी मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकार्यांना देण्यात आले.