मुंबई
न्यूट्रिशनिस्ट रजुता दिवेकर यांच्या मते, केवळ अँटी-इन्फ्लेमेटरी डाएट केल्यामुळे थेट वजन कमी होईलच असं नाही. मात्र अशा आहारपद्धतीचा शरीराला विविध प्रकारे फायदा होऊ शकतो. या आहारामध्ये साखर, मैदा, मद्य आणि प्रोसेस्ड फूड यांसारख्या पदार्थांचं सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. आहारातून अशा पदार्थांचं प्रमाण कमी केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्याच्या उद्देशाने आमिरच्या आहारात डार्क चॉकलेट, चरबीयुक्त मासे, चेरी, ब्रोकोली, ग्रीन टी, अॅवोकॅडो, द्राक्षे, टोमॅटो, मशरूम आणि बेरीज यांसारख्या पदार्थांचा समावेश करण्यात आला. या पदार्थांमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना राहू शकते, असा दावा केला जातो.वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत केवळ आहारच नव्हे, तर पुरेशी झोप आणि नियमित जीवनशैलीलाही महत्त्व आहे. कोणत्याही वयात शरीराला पुरेशी विश्रांती मिळणं आवश्यक मानलं जातं. झोप पूर्ण न झाल्यास शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि शरीराला सावरण्यास अधिक वेळ लागू शकतो. आमिर खाननेही आहारातील बदलांसोबत झोप, खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायाम या बाबींवर लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलं जात आहे.अशा प्रकारे काही महिन्यांच्या कालावधीत आहार आणि जीवनशैलीतील बदलांवर भर देत आमिर खानने १८ किलो वजन कमी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, वैद्यकीय स्थिती आणि आहाराच्या गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कोणतीही आहारपद्धती किंवा जीवनशैलीतील मोठा बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं.