राष्ट्रीय शिवाजी मंडळात दोन ज्येष्ठ सदस्यांचा वाढदिवस सोहळा

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
नागपूर,
rashtriya-shivaji-mandal राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा स्मारक समितीचे सचिव शेषरावकाका दुरुगकर आणि राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य नरेश काका आंबेकर यांचा वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष ओंकार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध धारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
rashtriya-shivaji-mandal
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेषराव दुरुगकर आणि नरेश आंबेकर यांचा शाल व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर दोघांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ॲड. अभय रणदिवे यांनी सूत्रसंचालन करत दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी विजय लुटे, कृष्णा लेदाडे, वसंतराव माथणे, नितिन चौधरी आणि अशोक निखाडे यांनी शुभेच्छा देत दोघांशी संबंधित आठवणींना उजाळा दिला.
 
अध्यक्षीय भाषणात ओंकार राऊत यांनी दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाबद्दल मनोगत व्यक्त केले. शेषराव दुरुगकर यांनी आपल्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर नरेश आंबेकर यांनी भावनिक मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड. अनिरुद्ध धारकर यांनी केले. यावेळी सतीश दीक्षित, प्रकाश भिसे, गंगाधर घुबे, चंबोले मामा, गोविंद नागपुरे, जयकाका कडू, रामदास मरसकोल्हे, रहाटे आणि राजू रामटेके यांच्यासह मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. अविनाश तितरमारे, संपर्क मित्र