मायावतींचे उत्तराधिकाराबाबत मोठे निर्णय

ईशान आनंदांना पक्षात महत्त्वाचे स्थान

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
bsp-new-decisionबहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर एक सविस्तर निवेदन जारी करून पक्षाची संघटना आणि उत्तराधिकारासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
 
bsp
मायावतींनी म्हटले आहे की, आकाश आनंद लग्नानंतर आपले सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली आले होते आणि त्यांच्या कारवायांमुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यांना पक्षात पुन्हा घेणे हा एक गंभीर विश्वासघात ठरेल. आकाश आनंद आणि त्यांच्या बहिणीला पक्षाच्या कोणत्याही जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवत, मायावतींनी आनंद कुमार यांचा धाकटा मुलगा, श्री. ईशान आनंद यांना पक्षात एक सन्माननीय स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मायावतींनी हे स्पष्ट केले आहे की, जर इशान आनंदनेही पक्षाविरुद्ध काम केले, तर त्यालाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. अशा परिस्थितीत, कुटुंबातील दुसऱ्या सदस्यावर जबाबदारी टाकण्याऐवजी, दलित समाजातील एका निष्ठावान आणि सेवाभावी कार्यकर्त्याला पुढे आणले जाईल. या निर्णयांवर आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, मायावतींनी २३ सप्टेंबर रोजी बसपाची एक अत्यंत महत्त्वाची अखिल भारतीय बैठक बोलावली होती.