देवळीतील चार खेळाडूंची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

श्री रामदास तडस क्रीडा अकादमीच्या कुस्तीपटूंचे यश

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
देवळी,
divisional-wrestling-competitionश्री रामदास तडस क्रीडा अकादमीच्या चार कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. पवन पोटदुखे (११० किलो वजन गट), यश पोटदुखे (९२ किलो वजन गट), धीरज पोटदुखे (९२ किलो वजन गट) आणि यश राठोड (७० किलो वजन गट) यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
 
devli
 
भंडारा येथे २७ व २८ तारखेला होणार्‍या विभागीय कुस्ती स्पर्धेत हे चारही खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यांनी देवळी येथील मा. खासदार रामदास तडस इनडोअर स्टेडियम येथे नियमित सराव केला असून, त्यांना रामदास तडस यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अभिनंदन केले.
 
 
खेळाडूंनी आपल्या खेळातील कौशल्यात सातत्याने सुधारणा करत नियमित सराव, कठोर मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर पुढील स्पर्धांसाठी तयारी करावी. जिल्हा व विभागीय स्तरावर मिळविलेले यश ही पुढील वाटचालीची सुरुवात असून, या कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावरही आपल्या खेळाचा ठसा उमटविण्यासाठी खेळाडूंनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन रामदास तडस यांनी केले. यावेळी रविंद्र कारोटकर, उमेश कामडी, वसंता ढोक, विनोद भगत, विजय चौधरी, कविश सुरकार आदी उपस्थित होते.