इम्रान खान यांच्या बहिणीला लाहोरमध्ये अटक

PTIच्या आंदोलनापूर्वी पाकिस्तानात राजकीय तणाव वाढला

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
लाहोर
imran khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या बहिणी अलीमा खान यांना पोलिसांनी लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, PTIच्या प्रवक्त्याने अलीमा खान यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी PTIकडून 27 सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने पाकिस्तानातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
 

imran khan, aleema khan, pti, pakistan, pakistan news, imran khan news, aleema khan arrest, pti protest, pti protest pakistan, lahore, islamabad, pakistan politics, imran khan latest, pti workers, pakistan political news 
इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेची मागणी सध्या PTIच्या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा आहे. पक्षाने 27 सप्टेंबर रोजी देशभरातून कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अलीमा खान यांच्या अटकेसह PTIच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.पोलिसांच्या या कारवाईवर PTIकडून सरकारवर आरोप करण्यात आला आहे. आंदोलनाची ताकद कमी करण्याच्या उद्देशाने पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा पक्षाने केला आहे. यापूर्वीही PTIच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे नियोजित आंदोलनापूर्वीच सरकार आणि PTI यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, संभाव्य आंदोलनाच्याimran khan  पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, सेंट्रल पोलीस ऑफिसमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. आंदोलनादरम्यान हिंसाचार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्थेच्या आराखड्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.आंदोलनासाठी देशाच्या विविध भागांतून कार्यकर्ते इस्लामाबादमध्ये दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी गेस्ट हाऊस, बस टर्मिनल तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी देखरेख वाढवली आहे. आंदोलनकर्त्यांना अन्न, पाणी, वाहतूक किंवा निवासाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. स्पेशल ब्रांच आणि काउंटर टेररिझम विभागासह विविध सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आल्याचेही वृत्त आहे.एकीकडे इम्रान खान यांच्या सुटकेसाठी PTIने देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली असताना दुसरीकडे पोलिसांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर कारवाई सुरू आहे. अलीमा खान यांच्या अटकेनंतर PTIची भूमिका आणखी आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 27 सप्टेंबरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाचा पुढील घटनाक्रम आणि त्याचा कायदा-सुव्यवस्थेवर होणारा परिणाम महत्त्वाचा ठरणार आहे.