तेहरान,
iran-execution-इस्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका इराणी व्यक्तीला इराणने फाशी दिली. इराणी न्यायपालिकेच्या वेबसाइटनुसार, हुसेन पाद्रानवर हेरगिरी आणि इस्रायलला गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप होता. त्याने इस्फहान प्रांतातील संवेदनशील लष्करी तळांविषयीची माहिती इस्राय
ली गुप्तचर संस्था मोसादला पुरवल्याचा आरोप आहे.
न्यायपालिकेने सांगितले की, हुसेन पाद्रानला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्यावर खटला चालवण्यात आला. न्यायालयाने त्याला या प्रकरणात दोषी ठरवले. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले हाेते़ मात्र, न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवला़ त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली.
माहितीच्या बदल्यात मिळाला आर्थिक लाभ
इराणच्या न्यायव्यवस्थेनुसार, हुसेन पाद्रान यांनी इस्फहान प्रांतातील संवेदनशील लष्करी तळांविषयीची गोपनीय माहिती अमेरिका आणि इस्रायलसह परदेशी गुप्तचर संस्थांना दिली होती. या माहितीच्या बदल्यात त्याला आर्थिक लाभ मिळाला, असा इराणी अधिकाऱ्यांचा दावा आहे. चौकशीदरम्यान पाद्रानने स्वतः या प्रक्रियेत आर्थिक लाभ मिळाल्याचे कबूल केले, असे न्यायव्यवस्थेने म्हटले आहे.
युद्धात अनेक लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले
इराणी न्यायव्यवस्थेनुसार, १२ दिवसांच्या युद्धात देशातील अनेक संवेदनशील लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये स्थानिक रहिवासी किंवा भाडोत्री सैनिकांनीही मदत केली होती. एका तपासात परदेशी संस्थांना संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या व्यक्तींची भूमिका उघड झाली. या तपासात हुसेन पाद्रानचे नावही समोर आले हाेते, असेही इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले.