माहेरवरुन पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
मालेगांव,
married-woman-harassed तालुयातील शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन घर बांधण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे.
 
 
married-woman-harassed
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती ज्ञानेश्वर कापसे वय २५, राहणार भानखेडा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली, सध्या राहणार ताकतोडा, तालुका मालेगाव यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांचा विवाह ज्ञानेश्वर रामेश्वर कापसे याच्यासोबत झाला असून, त्यांना श्रेयाण नावाचा ७ वर्षे वयाचा मुलगा आहे. तक्रारीनुसार, लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर पती, सासू, सासरे व दीर यांनी ‘तू दिसायला चांगली नाहीस, तुला स्वयंपाक करता येत नाही’ असे म्हणत वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच नवीन घर बांधण्यासाठी माहेरून सात लाख रुपये घेऊन ये, अन्यथा घरात राहू नकोस, अशी मागणी केल्याचा आरोप आहे.
 
 
सात लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून शारीरिक व मानसिक छळ करून आपल्याला घराबाहेर काढण्यात आले. तसेच पुन्हा घरात आलीस तर जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर रामेश्वर कापसे, रुख्मीणा रामेश्वर कापसे, रामेश्वर लिंबाजी कापसे आणि विठ्ठल रामेश्वर कापसे सर्व राहणार भानखेडा, तालूका सेनगाव, जिल्हा हिंगोली यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार योगिता भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार नागेश देवकर करीत आहेत.