नागपूर,
run of unity marathon नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन ऑफ युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी कच्ची विसा मैदान, लकडगंज, नागपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर ही मॅरेथॉन होणार आहे. या मॅरेथॉनच्या लोगोचे लोकार्पण आज रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, नागपूरच्या महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हातीबेड, स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दानी, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार संजयजी भेंडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दयाशंकरजी तिवारी, माजी खासदार विकासजी महात्मे, माजी खासदार सुधाकरजी कोहळे, माजी आमदार विकासभाऊ कुंभारे, क्रीडा सभापती दर्शनीताई धवड, मॅरेथॉनचे संयोजक नरेंद्र ‘बाल्या’ बोरकर, सत्तापक्ष नेते तसेच मनपा आयुक्त डॉ. विपिन इटणकर आणि क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉनच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.