‘डीसीसी’ बँकेच्या निवडणुकीला वेग

२१ सप्टेंबरला प्रारूप मतदार यादी, दिवाळीत रणधुमाळी

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
सोलापूर

solapur dcc bank election 2026 निवडणुकीसाठी १ जुलै २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या ठरावांच्या आधारे आता प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
 

solapur dcc bank election 2026 draft voter list on september 21, final list on october 14 
२१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणारी ही प्रारूप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. याशिवाय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच जिल्ह्यातील संबंधित तालुका सहकारी निवडणूक अधिकारी आणि उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयातही यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित सभासदांना त्यातील नोंदींबाबत आक्षेप किंवा हरकती नोंदविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या हरकतींची छाननी करून ९ ऑक्टोबरपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींनाही आता वेग येण्याची चिन्हे आहेत.