देशावर कल्पनेपेक्षा मोठे संकट, पुढच्या काही महिन्यात भयानक अल-नीनो

नद्या वाळणार, जंगले पेटणार, समुद्राचे पाणी उकळणार

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
el nio effect भारतामधील 180 हून अधिक पर्यावरण आणि हवामान वैज्ञानिकांनी आगामी अतिशय शक्तिशाली अल-नीनोच्या शक्यतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वैज्ञानिकांच्या मते 2026-27 मधील अल-नीनो सामान्य वर्षांच्या तुलनेत अधिक प्रभावशाली ठरू शकतो. त्याचा भारतातील जंगल, नद्या, समुद्र, पर्वतीय प्रदेश आणि वन्यजीवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

el nino 
 
या पृष्ठभूमीवर शास्त्रज्ञांनी सरकार, संशोधन संस्था आणि संशोधनासाठी निधी देणाèया संस्थांना तातडीने तयारी सुरू करण्याचे आवाहन केले आहे. नुकसान झाल्यानंतर त्याचा अभ्यास करण्याऐवजी आतापासूनच पर्यावरणीय बदलांचे निरीक्षण, नोंद आणि वैज्ञानिक पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा अभ्यास ‘सुपर अल-नीनोची दस्तक: 2026/27 : ईकोलॉजिस्टसाठी इशारा आणि आव्हान’ या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे.
 
अल-नीनो म्हणजे काय?
अल-नीनो ही प्रशांत महासागराशी संबंधित एक नैसर्गिक हवामान घटना आहे. या घटनेमध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढते. प्रशांत महासागरातील या तापमानवाढीचा परिणाम जगातील अनेक भागांतील हवामानावर होतो. भारतामध्ये अल-नीनोचा संबंध सामान्यतः कमकुवत किंवा उशिरा येणारा मान्सून आणि अधिक उष्ण हवामानाशी जोडला जातो. मात्र प्रत्येक अल-नीनोचा परिणाम सारखाच असेल असे नाही. त्याची तीव्रता, कालावधी आणि त्यावेळची इतर हवामानविषयक परिस्थिती यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
उष्णतेचा प्रकोप जाणवणार
वैज्ञानिकांना अशी भीती आहे की नोव्हेंबर 2026 पासून पुढील वर्षभरात भारतातील अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा अधिक उष्ण आणि कोरडे हवामान पाहायला मिळू शकते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम शेती, जंगल आणि पशुपालनावर होऊ शकतो.
ज्या भागांमध्ये आधीपासूनच पाण्याची कमतरता आहे; त्या प्रदेशांना अशा परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसू शकतो. वाळवंटी प्रदेश तसेच उंच पर्वतीय भागांमध्ये राहणाèया वनस्पती आणि प्राण्यांसाठीही अशी परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरू शकते.
पाण्याच्या स्रोतांवर दबाव वाढल्यास केवळ शेतीचे उत्पादन प्रभावित होणार नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. शेतकरी आणि पशुपालकांसमोर पाणी आणि चाèयाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
वणव्याचा धोका वाढू शकतो
सततची उष्णता आणि पाण्याची कमतरता यामुळे जंगलांमध्ये वणव्यांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कोरडी झालेली जंगले सहज पेट घेऊ शकतात आणि आग मोठ्या क्षेत्रात वेगाने पसरू शकते. यामुळे झाडे आणि वनस्पतींसोबत पक्षी तसेच इतर वन्यजीवांनाही मोठे नुकसान होऊ शकते. हवामानातील अचानक बदलांमुळे प्राण्यांच्या अन्नाच्या उपलब्धतेवर, प्रजनन चक्रावर आणि त्यांच्या अधिवासावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे जंगलांमधील विविध प्रजातींमधील संतुलन बदलण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम संपूर्ण अन्नसाखळीवर होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते वेळेत निरीक्षण वाढवले नाही तर अशा बदलांचा योग्य पद्धतीने अभ्यास करणे आणि त्यांची नोंद ठेवणे भविष्यात कठीण होऊ शकते.
समुद्रातही वाढू शकते समस्या
अल-नीनोचा प्रभाव केवळ जमिनीवरील परिसंस्थांवर होणार नाही. भारताच्या आसपासच्या समुद्री भागांमध्येही समुद्राच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्री उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते.