प्रतीक्षा संपली.... ई-बस अकोल्यात दाखल

आ.रणधीर सावरकर, खा.अनुप धोत्रेंकडून चार्जिंग स्टेशनची पाहणी

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
अकोला 
e buses- in akola शहराच्या महत्वाकांक्षी पी.एम.ई-बस सेवा लवकरत सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात २० बस अकोल्यात दाखल झाल्या आहेत.सोमवार २१ रोजी विधानसभा मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर, खा.अनुप धोत्रे, महापौर शारदा खेडकर, स्थायी सभापती विजय अग्रवाल यांनी पी.एम.ई-बस चार्जिंग स्टेशनची पाहणी केली.

e bus
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अत्यल्प दरात सर्व सुविधा युक्त, वातानुकूलित आणि सुरक्षित शहर वाहतुक उपलब्ध व्हावी या उद्देशाने आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे यांच्या अथक प्रयत्नाने प्रधानमंत्री यांच्या महत्वाकांक्षी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई-बस सेवा योजने अंतर्गत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी महानगरपालिकेस १२ मीटर लांबीच्या १४ आणि ९ मीटर लांबीच्या २८ अशा एकुण ४२ ई-बस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये २० बस अकोल्यात दाखल झाल्या आहेत.तसेच ई-बस साठीचे कंपनीचे चार्जिंग युनिट लावण्याचे काम अंतीम टप्प्यात असून येणा-या महिन्या भरात आरटीओची परवानगीचे काम पूर्ण होऊन बस अकोलेकरांच्या सेवेत सुरू होणार आहे. पाहणी दरम्यान यावेळी उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेता पवन महल्ले यांच्यासमवेत मनपा सहा.आयुक्त गणेश शहाणे, शहर अभियंता अजय गुजर, विद्युत विभागाचे उप अभियंता अमित सराग, अभियंता चेतन शंकरपुरे, प्रकल्प व्यवस्थापन समितीचे अभियंता आनंद वंजारी, कनिष्ठ अभियंता तुषार खोले यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पीएम ई-बस सेवेचा शुभारंभ व लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले.या बसमध्ये पूर्णपणे वातानुकूलित सीसीटीव्ही सुविधेसह महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांसाठी व्हील चेअरची सुविधा उपलब्ध असल्या संदर्भात देखील खा.धोत्रे यांनी स्पष्ट केले.