दिनदयाल उपाध्याय रोजगार कुंभमेळा

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
हिंगणघाट,
Employment Fairमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट येथे प्रशिक्षणाथ्र्यांसाठी रोजगारपूर्व तयारी व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणाथ्र्यांना उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, रोजगार मेळाव्याची प्रक्रिया, मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य तसेच बायोडाटा तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 

emplo 
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व उद्योग सहभागी होणार असून आयटीआय उत्तीर्ण तसेच प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणाथ्र्यांनी आवश्यक नोंदणी करून मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे, बायोडाटा व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. प्राचार्य तु. चि. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील शिल्पनिदेशक व कर्मचारी रोजगार महाकुंभाच्या आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत.