गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक

१०० किलो गोमांसासह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
गोंदिया,
gondia cow meat smuggling case गोंदिया येथून भंडार्‍याच्या दिशेने गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍या दोघांना तिरोडा पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १०० किलो गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोपेड असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
 

gondia cow meat smuggling case
पोलिसांना गोंदियाहून भंडार्‍याच्या दिशेने गोमांसाची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे रविवारी २० सप्टेंबर रोजी नाकाबंदी कारवाई करण्यात आली. यावेळी संशयित मोपेडची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे १०० किलो गोमांस आढळून आले. या प्रकरणी इरफान रफिक शेख (३२) रा. रामनगर, गोंदिया आणि अक्रम खान मिया खान पठाण (४०) रा. मांगली, जि. भंडारा या दोघाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून १५ हजार रुपये किमतीचे गोमांस आणि ८० हजार रुपये किमतीची मोपेड असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले मांस नेमके कोठून आणले होते आणि ते कोठे नेण्यात येत होते, याचा तपास पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुंगले, हवालदार नामुर्ते, पोलिस कर्मचारी अख्तर शेख, मोहित चौधरी, कैलास ठाकरे व इंगळे यांनी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दडस पाटील करीत आहेत.