लोणार,
kamalja mata temple प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे येथील जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवरतील कमळजा माता मंदिर पाण्याखाली गेले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज संपूर्ण लोणार शहर रस्त्यावर उतरलं असून, शहरात विराट 'चक्का जाम' आंदोलन करण्यात आलंय! लोणारकरांचा एल्गार! कमळजा माता मंदिर वाचवण्यासाठी महामार्ग रोखला! "मंदिर पाण्याबाहेर काढा!" चिमुरड्यांसह आबालवृद्ध हातात फलक घेऊन रस्त्यावर! सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र; महामार्गावर वाहनांच्या मैलोन्मैल रांगा!

लोणार सरोवराची पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं प्राचीन कमळजा मंदिर जलमग्न झालंय. वारंवार मागण्या करूनही पुरातत्त्व आणि स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. याच संतापातून आज लोणारमध्ये ऐतिहासिक आंदोलन पाहायला मिळालं.या आंदोलनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्वपक्षीय पदाधिकारी एकाच मंचावर आले. चिमुरड्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि शेकडो महिला हातात "कमळजा माता मंदिर पाण्याबाहेर काढा" असे फलक घेऊन रस्त्यावर ठिय्या मांडून बसल्या होत्या.kamalja mata temple या आंदोलनामुळे लोणार परिसरातील मुख्य वाहतूक तासनतास ठप्प झाली होती. अखेर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, जर पुढच्या काही दिवसांत पाणी उपसण्याचं काम सुरू झालं नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा ' लोणारकरानी दिला आहे.