मालेगाव,
malegaon water crisis मालेगाव शहरासह परिसरावर यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या प्रकल्पांमध्ये अपेक्षेच्या तुलनेत अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शयता निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसामुळे जलसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नसल्याने प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली असून, पाणीपुरवठ्याचे नियोजन वेळेत न केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
शहरातील अनेक भागात पाणीपुरवठ्याची वेळ व वारंवारता याबाबत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी जलस्रोतांचा शोध घेणे, पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे तसेच गळती व पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता, पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि अविरत उपशामुळे जलाशयांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. तालुयातील विहिरींची भूजल पातळी कमालीची खालावली असून, खाजगी बोअरवेलही आतापासूनच कोरडे पडू लागले आहेत. अनेक भागांत आत्तापासूनच टंचाईची चाहूल लागली असून, ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या प्रकल्पामधील शिल्लक जलसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आरक्षित करण्यात यावा. पाण्याच्या बिगर-गरजेच्या उपशावर बंदी घालून जिल्हाधिकार्यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलावीत आणि टंचाई निवारण आराखडा अमलात आणावा. वेळेवर नियोजन केले नाही तर आगामी उन्हाळ्यात मालेगाव तालुका व शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांकडून दिला जात आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण ५० टक्केच आहे. त्यामुळे तालुयातील सिंचन प्रकल्पात जलसाठा अत्यल्प आहे. पावसाळा परतीच्या मार्गावर असल्याने आगामी काळात पावसाची शयता कमी आहे.malegaon water crisis त्यामुळे सद्यस्थितीत प्रकल्पात असलेला जलसाठा राखून ठेवण्याची गरज आहे. पावसाने दीड महीना खंड दिल्यामुळे खरीप हंगाम हातून गेला आणि रब्बी हंगामासाठी पाण्याची टंचाई असल्याने हे दोन्ही हंगाम आता शेतकर्याच्या हातून गेल्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या दिवसात अन्नधान्यासह पाण्याची भिषण टंचाई निर्माण होण्याची शयता आहे. प्रशासनाने योग्य पावले उचलून प्रकल्पात असलेला जलसाठा आरक्षीत करण्याची मागणी होत आहे.