नवनीत राणा यांना जामीन मंजूर

निवडणूक काळातील प्रकरण

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
दर्यापूर
navneet rana तालुक्यातील ग्रामपंचायत खल्लार येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणात माजी खासदार तथा भाजपाच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांना आज २१ सप्टेंबर रोजी जामीन मिळाला. दर्यापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. डोके यांनी सदर जामीन अर्जावर सुनावणी घेतली.

rana 
 
२०२४ मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा या खल्लार येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यांच्या प्रचारसभेदरम्यान दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. सभास्थळी खुर्च्या फेकण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेप्रकरणी खल्लार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण सध्या जिल्हा न्यायालयात असून एकूण १२ आरोपी या प्रकरणात आहेत.
 
नवनीत राणा यांच्या वतीने ॲड. अजिंक्य धर्माधिकारी व ॲड. आदित्य धर्माधिकारी व ॲड. सूरज मालिये यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने नवनीत राणा यांना जामीन मंजूर केला. यावेळी विनोद गुहे, अविनाश काळे, अजय देशमुख, संजय भारसाकळे, अमोल कोरडे, किरण श्रीराव, अंकुश रहाटे, राहुल पाटील गावंडे, गोपाल यादव, श्रीकृष्ण अण्णा डोंगरे, समीक्षा साखरे, शैलेश मेटकर भाजपाचे मदन पाटील बायस्कार, नरेंद्र कुंदलवार, अनिल बोंडे, मेघा भारती आदी उपस्थित होते.