एक शाळा, एक भाषा’ उपक्रमातून कन्नडचे शिक्षण

बच्छराज व्यास विद्यालयात कन्नड कौशल्य विकास प्रकल्प सुरू

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
नागपूर :
One School, One Language वसुंधरा समाज दर्पण संस्थेच्या ‘एक शाळा एक भाषा’ उपक्रमांतर्गत पंडित बच्छराज व्यास विद्यालयात कन्नड भाषा कौशल्य विकास प्रकल्पाचा प्रारंभ झाला. या उपक्रमांतर्गत पाचव्या वर्गातील ५० विद्यार्थ्यांना वर्षभर कन्नड भाषेचे वाचन, लेखन व संभाषणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

charu
 
 
कन्नड कस्तुरी’ अभ्यास मंडळातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत हे वर्ग घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या भाषिक गुणवत्तावाढीसाठी विविध शैक्षणिक उपक्रमही राबविले जाणार आहेत. संस्थेने यापूर्वी बांग्ला व पंजाबी भाषेचेही कौशल्य विकास प्रकल्प सुरू केले आहेत.या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव चारुदत्त कहू, शिक्षक नरसिंह आचार्य, मनोज जोशी, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गजानन पिलपिले, कार्यवाह उपेंद्र जोशी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली तिजारे व उपमुख्याध्यापिका कविता मोहरील यांचे सहकार्य लाभत आहे.
सौजन्य: उषा भांडारकर,संपर्क मित्र