उंबर्डा बाजार येथे पोलिसांचे पथसंचलन

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
उंबर्डा बाजार, 
Police March-pastगणेशोत्सव व आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर उंबर्डा बाजार सह परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने २१ सप्टेंबर रोजी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत उंबर्डा बाजार येथील मुख्य मार्गावर पथसंचलन करण्यात आले.
 
poma
 
उंबर्डा बाजार येथे गणेशोत्सव व आगामी सणानिमित्त शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उंबर्डा बाजार येथील बसस्थानक परिसरातून पथसंचलनाला सुरुवात होऊन छ. शिवाजी महाराज चौक, गजानन महाराज मंदिर, पोलीस चौकी, शांती चौक, गांधी चौक व बसस्थानक चौकात पथसंचलनाचे समारोप करण्यात आला.
 
 
या पथसंचलनामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस स्टेशन कारंजा चे ठाणेदार प्रविण शिंदे, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल चव्हाण, मुकुंद जाधव तथा राखीव पोलिस दलाचे जवान, पोलिस कर्मचारी, होमगार्ड सैनिक व गृहरक्षकदलाच्या जवानांसह उंबर्डा बाजार पोलिस चौकीचे पोहेका मनोज गोफने, चेतन गावंडे, कपिल सुळके, व सहकारी मंडळी सहभागी झाले होते.