मुंबई
pravin darekar मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका कारचा अपघात झाला आहे. ताफा जात असताना फ्रीवेवर हा अपघात घडला. ताफ्यातील कारची एका टॅक्सीला धडक झाली. सुदैवाने अपघाताची तीव्रता कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून, प्रवीण दरेकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
गणेशोत्सवामुळे सध्या मुंबईतील रस्त्यांवर मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. खासगी वाहने तसेच टॅक्सींची संख्याही रस्त्यांवर वाढली आहे. त्यातच राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींकडून विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या जात असल्याने शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतुकीची वर्दळ दिसून येत आहे.याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा फ्रीवेवर अपघात झाला. ताफा पुढे जात असताना कार आणि टॅक्सीची धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. अपघाताची pravin darekar तीव्रता जास्त नसल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावर नागरिक आणि वाहनचालकांची गर्दी झाली. दरम्यान, प्रवीण दरेकर हेही आपल्या कारमधून बाहेर आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची वाढलेली वर्दळ असतानाच हा अपघात घडला. ताफ्यातील वाहन आणि टॅक्सी यांच्यात नेमकी कोणत्या कारणामुळे धडक झाली, याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अपघाताची तीव्रता कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.