शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी जमिनीत गाडून आंदोलन

प्रभाताई राव विचार मंचचे उपासे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
हिंगणघाट, 
farmers demands पिकांना योग्य मोबदला, वर्धा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी प्रभाताई राव विचार मंचचे प्रवीण उपासे यांनी आज सोमवार २१ रोजी तहसील कार्यालयाच्या परिसरात स्वत:ला जमिनीत गाडून अनोखे आंदोलन केले. प्रशासनाने तीन तासानंतर निवेदन स्विकारून मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले.
 
 
farmers demands
 
 
सोमवारी सकाळी ११ वाजता प्रभाताई राव विचार मंचाच्या वतीने मुख्यमंत्री यांना लिहिलेले निवेदन देण्यासाठी सर्वं कार्यकर्ते उपविभागीय कार्यालयासमोर एकत्रित आले होते. यावेळी विचार मंचचे कार्याध्यक्ष प्रवीण उपासे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने खड्डा खोदून स्वतःला जमिनीत गाडून घेतले. अखेर तीन तासानंतर नायब तहसीलदार भलावी हे घटनास्थळी आले व त्यांनी निवेदन स्विकारले.
कापसाला प्रति िंटल १५ हजार रुपये, सोयाबीनला १० हजार रुपये, २०२५-२६ या वर्षीचा पीकविमा १७ हजार ५०० रुपये प्रति हेटर त्वरित देण्यात यावे, आदी मागण्यासाठी ज्येष्ठ नेत्या चारूलता राव यांच्या सूचनेनुसार यांनी स्वतःला जमिनीत गाडून अनोखे आंदोलन करून प्रशासनाची झोप उडविली.farmers demands मागण्यांवर १५ दिवसात निर्णय न झाल्यास देवळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही प्रवीण उपासे यांनी दिला.
यावेळी मंचाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर वाघ, डॉ. रामकृष्ण खुजे, गुणवंत कोठेकर, अभय वानखेडे, अनिल हाते, प्रवीण पणप, सुरेश अराडे, गजानन बोरेकर, रवींद्र लांबट, प्रमोद हिवरे, अशोक भोसले, अमोल खडसे, पंकज राऊत, राजपाल फुलझेले, अमोल कुकडे, नानाजी मानकर, दिनकर वैद्य, राजू घुबडे, आदी उपस्थित होते.