नागपूर,
Senior Bhosala Palace महाल येथील सिनीयर भोसला पॅलेसमध्ये १७२८ पासून सुरू असलेली गणेशोत्सवाची २९८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. गणेशोत्सवाच्या सप्तमीला विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
या गणेशमूर्तीचा आकार, रंग आणि पारंपरिक स्वरूप गेल्या २९८ वर्षांपासून कायम ठेवण्यात आले आहे. भोसलेकालीन सिरपेज-तुरा असलेली पारंपरिक पगडी हे या मूर्तीचे विशेष वैशिष्ट्य आहे. राजघराण्याची ही ऐतिहासिक परंपरा आजही श्रद्धा आणि भक्तिभावाने जपली जात आहे.
सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र