थायलंड ओपनमध्ये नागपूरच्या शर्वरीला कांस्यपदक

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Sharvari Gosewade थायलंड ओपन फेन्सिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये नागपूरच्या शर्वरी विश्वास गोसेवाडे हिने महिला सांघिक साबर प्रकारात कांस्यपदक पटकावले. १८ देशांच्या सहभाग असलेल्या या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारातही तिने १२० खेळाडूंमध्ये अव्वल आठमध्ये स्थान मिळवले.
 
 
sk
 
 
शर्वरी सध्या SAI, अहमदाबाद येथे सराव करीत असून, तिच्या यशामागे प्रशिक्षक दीपक अयलवार, अंकित गजभिये, सागर भगत आणि सध्याचे प्रशिक्षक रोशन थापा यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे वडील विश्वास, आई स्मिता आणि भाऊ शंतनू यांचा तिला भक्कम पाठिंबा आहे. शर्वरीचे पुढील लक्ष्य ऑलिम्पिक २०२८ हे आहे.
सौजन्य:रजत बागडे,संपर्क मित्र