गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

    दिनांक :21-Sep-2026
Total Views |
नागपूर
Shivshambhu Ganesh Mandal शिवशंभू गणेश मंडळ, प्रसाद नगरच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या शिबिरात मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक युवक तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.

vb 
 
 
 
यावेळी वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत रक्तदात्यांची तपासणी करून रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना मदत होऊ शकते, या उद्देशाने शिबिर घेण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा हा प्रयत्न असून, नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य :शर्मिला चौरसिया,संपर्क मित्र