मूल
two bears create havoc रविवारी रात्रीच्या सुमारास नागपूर मार्गावरील शारदा पेट्रोल पंप परिसरात एक, तर सोमवारी भगतसिंग वॉर्ड परिसरात दुसरे अस्वल आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या दोन्ही अस्वलीला वनविभागाने जेरबंद केले.
शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास नागपूर मार्गावरील शारदा पेट्रोल पंपावर एक अस्वल असल्याचे वृत्त गावभर पसरले आणि त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली. वनविभागाने मोठ्या प्रयत्नाने त्या अस्वलीला जेरबंद केले. मात्र यानंतर सोमवार, 21 सप्टेंबरला पहाटे 4 वाजताच्या सुमारास भगतसिंग वॉर्डात अरुण टेकाम यांना रस्त्यावर आणखी एक अस्वल चालत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत आपले शेजारी व मित्र यांना माहिती दिली. त्यानंतर ही अस्वल भगतसिंग वॉर्डातील छत्रपती संभाजी गणेश मंडळाच्या मंडपाजवळ नागरिकांना दिसून आली. त्यानंतर तिने बादल करपे व अरुण येनप्रेड्डीवार यांच्या घरासमोर रिकाम्या जागेतील झुडुपांचा आसरा घेतला. बघताबघता नागरिकांची घनास्थळी प्रचंड गर्दी उसळली.
माहिती कळताच पोलिस प्रशासन व वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या अधिकार्यांनी तातडीने रेस्क्यू चमूला घटनास्थळी पाचारण केले. चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली आणि बेशुध्दीचे इंजेक्शन देऊन अस्वलीला जेरबंद केले व चंद्रपूरला पाठविले. शहरात धुमाकूळ घातलेल्या दोन्ही अस्वलांना वनविभागाने जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.