रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या

तीन जणांवर गुन्हा दाखल, १५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
गोंदिया
sand smugglers रेतीची अवैधरित्या तस्करी करणार्‍यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने दोन ठिकाणी कारवाई करीत ३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून २ ब्रास वाळू, २ ट्रॅक्टरसह १५ लाख १२ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
smugglers
जगदीश कोहळे, दिनेश तांडेकर व उमाकांत मनोहर लंजे अशी आरोपींची नावे आहे. पोलिस अधिक्षक. गोरख भामरे यांचे निर्देशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना डुग्गीपार पोलिस ठाणे हद्दीत सालईटोला ते देविटोला रस्त्यावर ट्रॅक्टरने अवैध रित्या वाळू वाहतूक करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सालईटोला ते देविटोला रस्त्यावर नाकाबंदी कारण्यात आली. यावेळी देविटोलाकडून येणार्‍या ट्रॅक्टरला थांबवून पंचासमक्ष पाहणी केली असता विना परवाना अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले.
 
याप्रकरणी उमाकांत मनोहर याचे विरोधात गुन्हा नोंद करून त्याच्याकडून १ ट्रॅक्टर ट्रॉलीसह १ ब्रास वाळू असा एकूण ७ लाख ६ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसरी कारवाई गोंदिया तालुक्यातील कारंजा ते डव्वा रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान, करण्यात आली असून आरोपी जगदीश कोहळे व दिनेश तांडेकर या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांच्या ताब्यातून १ ट्रॅक्टर ट्रॉलीसह १ ब्रास वाळू असा एकूण ८ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.