गहेलाटोला व नोनीटोल्यात दारुबंदीचा ‘एल्गार’!

गावकर्‍याचे पोलिसांसह तहसीलदार व राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
गोंदिया
ban-on-alcohol गोरेगाव तालुक्यातील नोनीटोला(सोनी) व घोटी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या गहेलाटोला (जानाटोला) येथील महीला समिती व गावकर्‍यांनी ग्रामसभेत गावातील अवैध दारुबंदीचा निर्णय घेत गोरेगाव पोलिसांसह तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन दारुबंदी करण्याची मागणी केली आहे.
 
ban on daru
नोनीटोला (सोनी) येथे गावात विशेषतः तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागूनच अवैध दारु विक्री सुरु आहे. दरम्यान विद्याथ्र्यांची सुरक्षितता, शैक्षणिक वातावरणावर दुष्परिणाम होत आहे. यावर आळा घालण्यात यावा म्हणून युवा जनक्रांती समितीने गावात ग्रामसभेचे नुकतेच आयोजन करून गावातील व शाळा परीसरात सुरु असलेला दारु व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेत पोलिस निरीक्षक, तहसीलदार, पोलिस अधीक्षक गोंदिया, राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंदिया यांना निवेदन सादर केले. यावेळी प्रमोद सोनवाने, विनोद पुंडे, नितीन कटरे, गोवर्धन पटले, धिरज बिसेन, सुभाष घारपिंडे, आशिष पुंडे, पवन कोडापे, अरुण येळे, मिथुन येळे, होमेंद्र पटले, नरेश पुंडे उपस्थित होते. तर दुसरीकडे घोटी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गहेलाटोला व जानाटोला वार्ड क्रमांक १ मध्ये अवैधपणे दारुविक्री सुरु असल्याने दारुबंदी समिती, सम्राट महीला ग्रामसंघ व गावकर्‍यांनी अवैध दारूविक्री विरोधात गावात सभेचे आयोजन करून दारूबंदीचा निर्णय घेत ही अवैध दारुविक्री कायमची बंद व्हावी व महीला, मुली यांना सुरक्षितता प्रदान व्हावी या उद्देशातून पोलिस निरीक्षक वैशाली ढाले, तहसीलदार प्रज्ञा बोकरे यांच्या नावे निवेदन दिले.
 
निवेदन सादर करताना दारुबंदी समिती अध्यक्ष मिता बावने, उपाध्यक्ष पौर्णिमा वैद्य, सचीव अल्का कटरे, पोलिस पाटील वर्षा गौतम, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष कोमेंद्र टेंभरे व गावातील महीला, पुरुष उपस्थित होते.