गणेशोत्सवात साकारली पंढरीची वारी

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
नागपूर,
ganesh-mandal 2026 गणेशोत्सवानिमित्त विविध गणेश मंडळांकडून आकर्षक आणि वैविध्यपूर्ण देखावे साकारले जात असताना, महाल संघ मुख्यालयाजवळील श्रीराम नागपूरकर यांनी आपल्या घरगुती गणपतीसमोर पंढरपूरच्या आषाढी वारीचा सुंदर देखावा उभारला आहे.विठ्ठल-रुख्मिणी, वारकरी, दिवेघाट तसेच वारीतील विविध प्रसंगांच्या प्रतिकृती आणि चित्रांच्या माध्यमातून पंढरपूरच्या भक्तिमय वातावरणाची अनुभूती या देखाव्यातून दिली आहे. टाळ-चिपळ्यांच्या गजरात विठ्ठलनामात दंग झालेल्या वारकऱ्यांचा देखावा विशेष आकर्षण ठरत आहे.
 
vari
 
 
 
श्रीराम नागपूरकर यांनी यंदा महाराष्ट्राची धार्मिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीची संकल्पना त्यांनी साकारली. मागील महिनाभरापासून ते या देखाव्याच्या निर्मितीत व्यस्त होते, अशी माहिती त्यांच्या आई पद्मा आणि वडील जितेंद्र नागपूरकर यांनी दिली.
सौजन्य :प्रदीप खर्डेनवीस, संपर्क मित्र