नागपूर ,
Ganesh Peth Ganeshotsav गणेश पेठ येथील वांडे निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अशोकजी धवड यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाची विधिवत महाआरती करून उपस्थितांसह गणेशोत्सवाचा आनंद घेतला.
या प्रसंगी रामटेक जिल्हा पदाधिकारी प्रकाश वांडे, जामुवंत वांडे, दिलीप गोतमारे, शुभांगी वांडे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते व अन्य मान्यवर उपस्थित होते. गणेशोत्सवानिमित्त उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक व धार्मिक उपक्रमांबाबतही संवाद साधला.
सौजन्य:जामुवंत वांडे,संपर्क मित्र