शिर्डी साई बाबा संस्थानला आंतरराष्ट्रीय आयएसओ प्रमाणपत्र

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |

 

शिर्डी

iiso-certification-shirdi शिर्डी येथील श्री साई बाबा संस्थान ट्रस्टच्या तीन प्रमुख विभागांना आंतरराष्ट्रीय आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. श्री साई बाबा संस्थान ट्रस्टने प्रशासन आणि सेवा व्यवस्थापनात केलेल्या प्रचंड प्रयत्नांचे हे एक यश आहे.


shirdi 
 
श्री साई बाबा संस्थान ट्रस्टच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सुरक्षा, साई मंदिर आणि जनसंपर्क या तीन विभागांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धती, शिस्तबद्ध नियोजन, पारदर्शक सेवा आणि निर्धारित मानकांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
 

ट्रस्टच्या अंतर्गत चाळीस विभाग

श्री साई बाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोरख गाडीलकर यांनी या यशाबद्दल संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले़ श्री साई बाबा संस्थान ट्रस्टच्या अंतर्गत असलेले चाळीस विभाग अत्यंत कार्यक्षमतेने काम करतात. कर्मचारी कठोर परिश्रम आणि उत्साहाने काम करतात आणि हे प्रमाणपत्र त्यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने मिळालेली पोचपावती आहे.
 

कर्मचारी नाेकरी नव्हे, सेवा म्हणून करतात काम

दररोज लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीला भेट देतात. भाविकांची वाढती संख्या सांभाळण्यासाठी आणि दर्शनाचे वेळापत्रक, सुरक्षा, निवास आणि भोजनासारख्या सेवा सुरळीतपणे पुरवण्यासाठी संस्थानाची प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. संस्थानमध्ये अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांसह अंदाजे ६,३०० कर्मचारी आहेत, जे ४० विविध विभागांचे मोठे कामकाज सांभाळतात. अनेक कर्मचारी आपले काम केवळ एक नोकरी न मानता साईबाबांची सेवा मानतात.