आयआयटी मुंबई कॅम्पस, हॉस्टेलमधून सीलिंग फॅन हटवणार

आत्महत्येच्या घटनेनंतर निर्णय

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
मुंबई
suicide incident आयआयटी मुंबईमध्ये बीटेकचा विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे यांच्या मृत्यूनंतर कॅम्पस आणि वसतिगृहातील सीलिंग फॅन काढून त्यांच्या जागी वॉल फॅन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅम्पसमध्ये वॉल फॅन पोहोचल्याचे छायाचित्र सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे.
 
iit bombay
सूत्रांनुसार, पंखे बदलण्याबाबतची चर्चा जुलैमध्ये एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर सुरू झाली होती. 18 सप्टेंबर रोजी साहिलच्या मृत्यूनंतर हा निर्णय लागू करण्यात आला. साहिलच्या मृत्यूबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू आहे.
विद्यार्थी संस्थेत उत्तरदायित्व, पारदर्शकता, विद्यार्थी कल्याण आणि मानसिक आरोग्याच्या व्यवस्थेत बदल करण्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, आयआयटी बॉम्बे फॅकल्टी फोरमने आरोपी प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांचे समर्थन केले आहे. तसेच आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मद्रासचे प्राध्यापकही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
साहिल 22 वर्षांचा होता. तो आयआयटी बॉम्बेच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो महाराष्ट—ातील यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता.
क्राइम ब्रांचच्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 ते 12:45च्या दरम्यान परीक्षा हॉलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साहिल खिशात ठेवलेली एखादी वस्तू पाहण्यासाठी वाकताना दिसला. त्यानंतर एका प्राध्यापकाने त्याला प्रश्न विचारून बाजूला नेले. क्राइम ब्रांचच्या माहितीनुसार, साहिल 1:25 वाजता वसतिगृहातील खोलीत पोहोचला. त्यानंतर बाहेर पडला नाही. नंतर त्याच दिवशी तो आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला. गुन्हे शाखेच्या एका अधिकाèयानुसार, परीक्षा हॉल, कॅम्पस आणि वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. मात्र, फुटेज अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही आणि ते केवळ तपास पथकच पाहत आहे.