एशियन गेम्समध्ये भारताचे सुवर्ण खाते उघडले

श्रीलंकेला १४७ धावांनी धूळ चारत महिला संघाचा दिमाखदार विजय

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
आयची-नागोया
ind w vs sl w live score आयची-नागोया येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने दिमाखदार कामगिरी करत भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा तब्बल १४७ धावांनी पराभव करत भारताने विजेतेपदावर नाव कोरले. या विजयामुळे भारतीय महिला संघाने एशियाडमधील आपल्या मागील सुवर्णपदकाचेही यशस्वीपणे रक्षण केले.
 

ind w vs sl w live score 
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी या संधीचे सोने करत २० षटकांत तीन गडी गमावून तब्बल २१६ धावा उभारल्या. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा आणि रिचा घोष यांनी आक्रमक तसेच प्रभावी फलंदाजी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
भारताने दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजीची अक्षरशः वाताहत झाली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकन फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ १५.४ षटकांत अवघ्या ६९ धावांत गारद झाला. दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजी आक्रमणाने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे श्रीलंकेला सामन्यात पुनरागमनाची कोणतीही संधी मिळाली नाही.
१४७ धावांचा हा विजय अंतिम सामन्यातील भारताचे निर्विवाद वर्चस्व अधोरेखित करणारा ठरला. विशेष म्हणजे, या सामन्यात २१६ धावांची मजल मारत भारतीय महिला संघाने एशियन गेम्सच्या महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही नोंदवला.
स्पर्धेला सुरुवात ind w vs sl w live score होण्यापूर्वीच भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानले जात होते. मैदानावरील कामगिरीतून खेळाडूंनी या अपेक्षांना साजेशी कामगिरी करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारल्यानंतर गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या ६९ धावांत गुंडाळत भारताच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पाकिस्तानच्या संघाने कांस्यपदक पटकावले. भारतीय महिला संघाच्या या सुवर्ण कामगिरीमुळे आयची-नागोया एशियन गेम्समधील भारताचे पदक खाते थाटात उघडले असून, देशाच्या सुवर्णपदकाची प्रतीक्षा महिला क्रिकेटपटूंनी संपवली आहे.