इन्स्टाग्रामवरील मैत्रीचा शेवट लैंगिक अत्याचारात

१६ वर्षीय मुलगी चार महिन्यांची गर्भवती; चंद्रपूरच्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
Sexual Assault इन्स्टाग्रामवरून झालेल्या मैत्रीचे रूपांतर लैंगिक अत्याचारात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील २१ वर्षीय तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणीत मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
 

Instagram Friendship Leads to Sexual Assault 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सीताबर्डी येथील एका महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी मनीष मोहरले (२१, रा. वरोरा, जि. चंद्रपूर) याच्याशी मैत्री झाली होती. ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता आरोपीने चारचाकी वाहनातून मुलीला हिंगणा परिसरातील नर्मदा नगरी येथील एका मोकळ्या जागेत नेले. तेथे वाहनात तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर काही महिने हा प्रकार उघडकीस आला नाही. दरम्यान, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडितेच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी मनीष मोहरले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१) अन्वये बलात्काराचा, तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.