राधेश्वर नगरात बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Juni Dighori Radheshwar Nagar जुनी दिघोरी येथील राधेश्वर नगर सेवा वस्तीतील नर्मदेश्वर हनुमान मंदिरात बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिराचे प्रमुख दिलीपराव ठाकरे होते. प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी रामचंद्र बोडखे व लोककल्याण समितीच्या मुग्धा देशपांडे उपस्थित होत्या.

pohs 
 
 
यावेळी दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बोडखे यांनी मुलांना संस्कारांचे महत्त्व सांगितले, तर देशपांडे यांनी गोष्टी सांगून मुलांचे खेळ घेतले. शिबिराला ३५ ते ४० बालक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सतीश देशपांडे यांनी मानले.
सौजन्य: सतीश देशपांडे,संपर्क मित्र