गडचिरोली,
alapalli-marathon आलापल्ली बेलव्ड राजा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या मॅराथॉन स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुरुषांच्या खुल्या 5 किलोमीटर गटात यश बुधाकर याने, तर महिलांच्या 3 किलोमीटर गटात मोनिका सानू मडावी हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
खेळाडूंच्या या यशामागे सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या कामगिरीबद्दल लॉयड्स मेटल्स ण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी यश, मोनिका तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. दुर्गम भागातील युवा खेळाडूंना क्रीडा सुविधा व विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध होत असल्याने त्यांच्यातील प्रतिभेला व्यासपीठ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या यशामुळे लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीशी जोडलेल्या अन्य युवा खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळाले असून, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात नव्या प्रतिभांना घडविण्यासाठी अकादमीच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.