राज्यातील 5 शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा, मतदान मतमोजणी कधी?

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
मुंबई
maharashtra legislative council election 2026 महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अमरावती, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील या जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे.
 

maharashtra legislative council election 2026 
विधानपरिषदेतील संबंधित सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या पाच जागांवर निवडणूक घेण्यात येत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी काळात विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू होणार असून इच्छुकांच्या नावांचीही चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
 
 
महाराष्ट्रातील निवडणुकीत तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत वंजारी यांनी केले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक, तर पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर हे विद्यमान सदस्य आहेत. या पाचही सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या जागी नव्या प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे.
 
 
 
दरम्यान, महाराष्ट्रासोबतच बिहार,maharashtra legislative council election 2026  कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील विधानपरिषदेच्या जागांसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बिहारमध्ये विधानपरिषदेच्या आठ जागा रिक्त होत असून त्यापैकी चार शिक्षक आणि चार पदवीधर मतदारसंघाच्या जागा आहेत. कर्नाटकातील चार जागांमध्ये दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार असून त्यात पाच पदवीधर आणि सहा शिक्षक मतदारसंघ आहेत.
 
 
 
महाराष्ट्रातील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने आता सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळासह संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत बैठका, उमेदवारांच्या नावांवर चर्चा आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव यांना वेग येण्याची शक्यता आहे.