नागपूर ,
National Shivaji Mandal राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा स्मारक समितीचे सचिव शेषराव दुरुगकर आणि मंडळाचे ज्येष्ठ सदस्य नरेश आंबेकर यांचा वाढदिवस सोहळा १९ सप्टेंबर रोजी मंडळाचे अध्यक्ष ओंकार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध धारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दोघांचा शाल व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. ॲड. अभय रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले. विजय लुटे, कृष्णाजी लेदाडे, वसंतराव माथणे, नितीन चौधरी आणि अशोक निखाडे यांनी शुभेच्छा देत दोघांच्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात ओंकार राऊत यांनी दोघांच्या मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.शेषराव दुरुगकर व नरेश आंबेकर यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. ॲड. अनिरुद्ध धारकर यांनी आभार मानले. यावेळी सतीश दीक्षित, प्रकाश भिसे, गंगाधर घुबे, गोविंद नागपुरे, जयकाका कडू, रामदास मरसकोल्हे, राजू रामटेके यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सौजन्य:डॉ. अविनाश तितरमारे,संपर्क मित्र