वडनगर ते वाराणसी सेवायात्रा गुरुवारी अमरावतीत

भाजयुमोचा सेवाभाव आणि राष्ट्रनिर्माण उपक्रम

    दिनांक :22-Sep-2026
Total Views |
अमरावती
seva-yatra भारतीय जनता युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या जनसेवेपासून प्रेरणा घेऊन ‘वडनगर ते वाराणसी सेवा यात्रा’ या विशेष अभियानाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमांग जोशी यांच्या संकल्पनेतून व भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. ही यात्रा २४ सप्टेंबरला अमरावतीत येणार आहे.
 
seva yatra
मेळघाट, अचलपूर, अमरावती, तिवसा या विधानसभा मतदारसंघाचा प्रवास करून ही यात्रा २५ सप्टेंबरला वर्धा जिल्ह्यात जाणार आहे. यात्रा १७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. वडनगर ते वाराणसी आणि वाराणसी ते वडनगर अशा दोन्ही दिशांनी ती काढण्यात येणार आहे. देशभरातील सुमारे असंख्य युवा कार्यकर्ते या सेवायात्रेत सहभागी होणार असून, सुमारे २० मार्गांवरून १९३ जिल्हे, ७७३ तहसील आणि १,१५९ गावांमध्ये विविध सेवाकार्ये व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात्रेची विशेष संकल्पना ‘स्वच्छतेने स्वागत’ असून, सेवा यात्रेकरू पोहोचण्याच्या दोन दिवस आधी संबंधित परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
 
धारणी येथून ही यात्रा महाराष्ट्र मध्ये प्रवेश करणार आहे. या यात्रेदरम्यान कळमखार येथे वृक्षारोपण, सेमाडोह येथे जनजाती समुदाय संवाद व लाभार्थी संवाद तसेच वृक्षारोपण, अमरावती शहर येथे युवा संवाद व वृक्षारोपण, मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सामाजिक बांधिलकीचा संदेश देत पुढे तिवसा ,वर्धा जिल्ह्यातील कारंजा करत नागपूर, भंडारा गोंदिया जिल्ह्यामधून ही यात्रा मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करणार आहे. यात्रा मार्गात केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी, विद्यार्थ्यांशी व युवकांशी संवाद साधला जाणार आहे. सफाई कामगार, अंगणवाडी सेविका तसेच बचत गटांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला भाजपाचे विदर्भ संयोजक प्रा. दिनेश सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष डाॅ. नितिन धांडे, आमदार प्रवीण तायडे, जयंत डेहनकर, ललित समदुरकर, यात्रेचे विदर्भ समन्वयक सुरज गुप्ता, भाजयुमो शहराध्यक्ष विक्की शर्मा व अन्य उपस्थित होते.