सानो,
thrilling-victory-for-india भारत आणि जपान यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. पावसामुळे आणि ओल्या खेळपट्टीमुळे सामना प्रत्येकी पाच षटकांचा करण्यात आला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकांत ३२ धावा उभारल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना जपानने चार षटकांत तीन गडी गमावत २५ धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात जपानसमोर विजयासाठी आठ धावांचे आव्हान होते.
भारताकडून अक्षर पटेलने अखेरचे षटक टाकले. पहिल्या चेंडूवर धाव झाली नाही, तर दुसऱ्या चेंडूवर एक धाव मिळाली. त्यानंतर अक्षरने टाकलेला पुढील चेंडू वाईड ठरवण्यात आला. पुन्हा टाकलेल्या चेंडूलाही पंचांनी सुरुवातीला वाईडचा निर्णय दिला. मात्र, या निर्णयानंतर भारतीय संघाकडून आक्षेप घेण्यात आला. यष्टीरक्षक संजू सॅमसनने नाराजी व्यक्त केली, तर कर्णधार श्रेयस अय्यरने पंचांशी चर्चा केली. दोन्ही पंचांनी आपसात चर्चा केल्यानंतर आधी दिलेला वाईडचा निर्णय बदलण्यात आला.
या निर्णयामुळे सामन्यातील शेवटच्या काही चेंडूंचे महत्त्व आणखी वाढले. जपानने उर्वरित तीन चेंडूंवर आणखी तीन धावा केल्या, मात्र विजयासाठी आवश्यक धावसंख्या गाठता आली नाही आणि संघ दोन धावांनी मागे राहिला. विशेष म्हणजे, वादग्रस्त चेंडू वाईड म्हणून कायम राहिला असता तर जपानच्या खात्यात आणखी एक धाव जमा झाली असती आणि सामना बरोबरीत जाण्याची शक्यता निर्माण झाली असती. त्यामुळे पंचांनी वाईडचा निर्णय का बदलला, सुरुवातीचा निर्णय योग्य होता की नंतरचा, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.