‘नटरंग’नंतर १६ वर्षांनी रवी जाधव पुन्हा लावणीच्या दुनियेत

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
मुंबई
phulvara release date announced लावणीचा ठेका, लोककलेची समृद्ध परंपरा आणि मराठी मातीचा अस्सल गंध यांचा अनुभव पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. ‘नटरंग’नंतर तब्बल १६ वर्षांनी झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक रवी जाधव ही जोडी लावणीप्रधान चित्रपटासाठी एकत्र आली असून, ‘फुलवरा’ या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर, १४ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
 
phulvara release date announced
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या घोषणेसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमुळेही ‘फुलवरा’विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पूजेच्या ताटात विराजमान असलेला देवी अंबाबाईचा मुखवटा आणि त्यासोबत ‘आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्या आणि अस्सल मराठी लावणीला बळ द्या’ अशी टॅगलाईन पोस्टरवर पाहायला मिळते. ‘अस्सल मराठी लावणी’ या शब्दांवर विशेष भर देण्यात आल्याने लावणीच्या पारंपरिक रूपाचा आणि तिच्या बदलत्या काळाशी असलेल्या नात्याचा वेध चित्रपटातून घेतला जाणार असल्याचे संकेत मिळतात. मात्र, ‘फुलवरा’ची कथा नेमकी कोणत्या दिशेने पुढे जाणार, लावणीच्या परंपरेची आणि समकालीन वास्तवाची सांगड कशी घातली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चित्रपटातील कलाकारांची नावेही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
 
 
लोककलेच्या क्षेत्रात आपल्या आगळ्या सादरीकरणामुळे ओळख निर्माण करणाऱ्या ‘द फोक आख्यान’मधील हर्ष-विजय या संगीतकार जोडीने ‘फुलवरा’चे संगीत दिले आहे. ‘द फोक आख्यान’चे लेखक आणि सादरकर्ते ईश्वर ताराबाई अंधारे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत. लोककलेचा सखोल अभ्यास, नव्या पिढीची लोकसंगीताकडे पाहण्याची दृष्टी आणि रवी जाधव यांचा या कलाप्रकाराशी असलेला दीर्घ अनुभव यांचा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लावणीचा केवळ मनोरंजनात्मक किंवा रंगमंचीय आविष्कार न करता तिच्यामागील संस्कृती, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेले स्वरूपही चित्रपटातून मांडले जाण्याची. तमाशा ही महाराष्ट्राच्या लोककलेचा प्राण असून लावणी ही त्या लोककलेची सम्राज्ञी असल्याने या समृद्ध परंपरेवर चित्रपट साकारणे ही मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी नम शक्यता आहे.
 
 
 
‘फुलवरा’विषयी बोलताना दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘नटरंग’नंतर १६ वर्षांनी पुन्हा तमाशापट करण्याचे धाडस करत असल्याचे सांगितले. तमाशा ही महाराष्ट्राच्या लोककलेचा प्राण असून लावणी ही त्या लोककलेची सम्राज्ञी असल्याने या समृद्ध परंपरेवर चित्रपट साकारणे ही मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. याच जाणिवेतून ‘फुलवरा’ची निर्मिती करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
‘नटरंग’ची कथा सत्तरच्या phulvara release date announced दशकात घडत असताना ‘फुलवरा’ची कथा २०१५ मध्ये घडते. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील तमाशा बदलत गेला असला तरी आपली ‘अस्सल मराठी’ कला जपण्याची आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची तमाशा कलावंतांची धडपड आजही कायम आहे. या प्रवासात त्यांनी केलेला संघर्ष आणि त्याग मोठा असल्याचे रवी जाधव यांनी सांगितले. अनेक गुणी कलावंतांच्या कलेने सजलेल्या ‘फुलवरा’ला ‘नटरंग’प्रमाणेच प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळतील, तसेच ‘अस्सल मराठी’ लावणीला नव्या पिढीसमोर नवे बळ मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
 
 
झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली. ‘नटरंग’नंतर झी स्टुडिओज, रवी जाधव आणि लावणीप्रधान चित्रपट हे समीकरण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत असल्याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाची संकल्पना ऐकल्यापासूनच त्याबद्दल उत्सुकता असल्याचे नमूद करत, ‘फुलवरा’च्या निमित्ताने झी स्टुडिओजच्या नव्या वर्षाची सुरुवात आश्वासक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी लावणीचे अस्सल रूप या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि ते त्यांना आवडेल, असेही त्यांनी म्हटले.
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘फुलवरा’ १४ जानेवारी २०२७ रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकारांची निवड आणि लावणीचा नेमका कोणता रंग या कलाकृतीतून उलगडणार, याबाबतची माहिती अद्याप जाहीर व्हायची आहे. त्यामुळे ‘नटरंग’नंतर रवी जाधव यांच्या लावणीप्रधान चित्रपटाची नव्या रूपातील सफर कशी असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.